तरुण उद्योजकांसाठी 6 सर्वोत्कृष्ट व्यवसाय
"माझा स्वतःचा व्यवसाय मला आत्ताच सुरु करायचा आहे" असे तुमचे मत आहे का?
आजचा तरुण हा उद्योगी होऊ लागला आहे. फक्त त्याच्यासमोर काही प्रश्न आहेत.
१.कोणता व्यवसाय मी केला पाहिजे?
२.कमी गुंतवणुकीचे व्यवसाय कोणते?
३. कोणत्या व्यवसायात Risk कमी असते?
४. सध्या कोणत्या व्यवसायाची गरज जास्त आहे? इत्यादी
तुम्हाला लगेच व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तोसुद्धा कमी गुंतवणुकीमध्ये तर तुम्ही हा Blog शेवटपर्यंत वाचा. आज तरुणांची सर्वात मोठी ताकद म्हणजे तंत्रज्ञान आणि इंटरनेट आहे. शिवाय प्रचंड माहिती आज तरुणांकडे उपलब्ध आहे. ह्या सर्व गोष्टींचा उपयोग करून तुम्ही बरेच व्यवसाय करू शकता. त्यातील सहा व्यवसाय संध्या मी ह्या लेखात नमूद केल्या आहेत. पुढील काही लेखांमध्ये आणखीन व्यवसायांबद्दल आपण बोलू. फक्त एक गोष्ट महत्वाची ज्याची तुम्हाला प्रचंड गरज लागेल ती म्हणजे "सातत्य".
मी अजय दरेकर तुमचा युवा व्यवसाय मार्गदर्शक, Versatile Youth Business Forum चा एक संस्थापक. गेले १७ वर्ष मी हजारो तरुणांना व्यवसाय आणि स्किल मार्गदर्शन करीत आहे. येत्या ३ वर्षात १०० नवीन तरुण व्यवसायिक घडवण्यासाठी कार्यतत्पर आहे. तुम्हाला ह्या Mission मध्ये सहभागी व्हायचे असेल तर ब्लॉग च्या खाली Facebook आणि Whats app ग्रुप ची लिंक दिली आहे. चला मग पाहुयात "तरुण उद्योजकांसाठीचे 6 सर्वोत्कृष्ट व्यवसाय"
एका तरुणासाठी Tutor होण्याएवढा कमी Risk चा Business दुसरा नाही. आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देता येऊ शकते. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या चांगल्या कोचिंग इन्स्टिट्युट ला भेट देऊन तिथे Tutor म्हणून काम करायला सुरुवात करू शकता. कालांतराने तुम्ही स्वतःची इन्स्टिटयूट चालू करू शकता.
जर तुम्ही अभ्यासात रस ठेवत नसाल तर तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही कलेचे ज्ञान तुम्ही द्यायला सुरुवात करू शकता. एकदा का तुमची इन्स्टिटयूट चांगली चालू लागली कि वेगवेगळ्या Strategies वापरून तुम्ही त्यात उत्कृष्ट कार्य करू शकता. उदा.
तुमच्या इन्स्टिटयूट मध्ये उत्कृष्ट शिक्षक व टीम आणणे.
टेकनॉलॉजि चा उपयोग करणे.
इत्यादी
Versatile Educaare System शिक्षण आणि विद्यार्थी विकास क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करीत आहे. तुम्ही त्यासाठी संपर्क करू शकता.
२. Youtube Channel सुरु करा -
आजच्या काळात कमी गुंतवणुकीत जास्त माणसांपर्यंत आपला व्यवसाय पोहचवण्यासाठी YouTube Channel हे जबरदस्त माध्यम ठरत आहे. ह्यासाठी तुम्हाला एक चांगला माईक, कॅमेरा व Background सेट अप याची गरज आहे. नक्कीच सरावाने तुम्ही Content आणि Camera Skills यावर प्रभुत्व मिळवू शकता. ह्या व्यवसायामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात जास्त ज्ञान मिळवू लागता. यासोबतच तुम्ही तुमचे Facebook, Instagram, व्यवसायासाठी वापरू शकता.
तुम्ही तुमच्या YouTube Channel वरून इतर लोकांचे तुम्हाला आवडलेले व तुमच्या ग्राहकांना उपयोगी कोर्स विकू शकता.
३. Online Course विकणे -
Corrona च्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जग इंटरनेट युनिव्हर्सिटी वर शिकु लागले आहे. अगदी संगीत शिकण्यापासुन, व्यवसाय मार्गदर्शनाचे कोर्सेस लोक online करत आहेत. तुमच्याकडे असलेल्या एखाद्या विषयाचे ज्ञान तुम्ही कोर्स स्वरूपात जगासमोर ONLINE आणू शकता.
त्याशिवाय एखादी कंपनी किंवा व्यक्ती ज्यांच्याकडे चांगले कोर्से आहेत ते विकण्यासाठी मदत करून पैसे कमावू शकता. Versatile Educaare System कडे ११ पेक्षा जास्त Brain आणि Skill Development चे कोर्सेस आहेत. गेल्या १७ वर्षाचा गाढा अनुभव असलेले हे कोर्सेस तुम्हीदेखील विकू शकता. त्यासाठी तुम्ही पुढील Community जी विशेषकरून तरुण व्यवसायिकांसाठी तयार केली आहे तुम्ही Join करू शकता.
४. Freelancing-
तुमच्याकडे Data Entry , Copywriting , ग्राफिक Designing, Content Writing, Web Development सारख्या Skills असतील तर तुम्ही Freelancing करू शकता. Freelancing मधून तुम्हाला ताशी किंवा प्रत्येक दिवशी Income मिळू शकते. तुम्ही इतर कंपन्यांसोबत संलग्न होऊ शकता. त्यांना तुम्ही वरील गोष्टींच्या सेवा देऊन स्वतःचे उत्पन्न निर्माण करू शकता. सुरुवातीला कमी किमतीत तुम्ही तुमची सेवा देऊन नंतर जास्त उत्पन्न निर्माण करू शकता.
५. Video or Photo Editor-
हल्ली YouTube व Social Media मार्केटिंग मुळे विडिओ व फोटो Editing च्या क्षेत्राला खूप महत्व आले आहे. चांगल्या Youtubers आणि Social मीडिया चे व्यवसायिक आज Video व Photo एडिटर्स ना चांगले पैसे देतात. विशेष म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही Online शिकू शकता. तुम्हाला Editing सॉफ्टवेअर साठी थोडी गुंतवणूक करावी लागेल. अश्याच पद्धतीचा एक कन्सेप्ट CircleConcept या नावाने काही तरुणांनी चालू केला आहे. तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता.
६. Blogging
आजच्या घडीला Blogging हि खूप प्रसिद्ध व्यवसाय कल्पना आहे. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक क्षेत्र (nich) निवडावे लागेल. YouTube वर असे बरेच यशस्वी Bloggers आहेत जे तुम्हाला यासंदर्भात मार्गदर्शन करतात. Part-Time काम करून तुम्ही ह्या क्षेत्रात चांगला पैसा व नाव कमावू शकता.
Blogging चा उपयोग तुम्ही पुढील माध्यमांमधून पैसे कमावण्यासाठी करू शकता.
Google Adsense
Affiliates Marketing
Selling products on Website
Selling Online Course
Sponsored Post
Consulting people
Email marketing
Social media Influencer
तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास कंमेंट करा आणि माझ्या व्यवसायिक घडवण्याच्या मोहिमेत शामिल व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक नक्की करा
Facebook - https://www.facebook.com/groups/4572379476137547/?ref=share (ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी हा ग्रुप जॉईन करा )
Whats App - https://chat.whatsapp.com/CmYJWW1B2yAHM4kfQkUpN7
Youtube- https://www.youtube.com/results?search_query=versatile+educare+system
इतर ब्लॉग
"५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात" -
"तरुणांनो" हे "५ मुलभूत तरी अतिप्रभावी" गुण तुमच्या व्यावसायिकतेचा पाया उत्कृष्ट करतील -
"तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या"-
“व्यवसाय अयशस्वी होण्याची 6 कारणे व त्यावरील उपाय “







Nice information sir
ReplyDeleteAmazing blog
ReplyDeleteGreat Blog
ReplyDelete