Posts

तरुण उद्योजकांसाठी 6 सर्वोत्कृष्ट व्यवसाय

Image
              "माझा स्वतःचा व्यवसाय मला आत्ताच सुरु करायचा आहे" असे तुमचे मत आहे का? आजचा तरुण हा उद्योगी होऊ लागला आहे. फक्त त्याच्यासमोर काही प्रश्न आहेत.  १.कोणता व्यवसाय मी केला पाहिजे?  २.कमी गुंतवणुकीचे व्यवसाय कोणते?  ३. कोणत्या व्यवसायात Risk कमी असते?  ४. सध्या कोणत्या व्यवसायाची गरज जास्त आहे? इत्यादी                              तुम्हाला लगेच व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तोसुद्धा कमी गुंतवणुकीमध्ये तर तुम्ही हा Blog शेवटपर्यंत वाचा. आज तरुणांची सर्वात मोठी ताकद म्हणजे तंत्रज्ञान आणि इंटरनेट आहे. शिवाय प्रचंड माहिती आज तरुणांकडे उपलब्ध आहे. ह्या सर्व गोष्टींचा उपयोग करून तुम्ही बरेच व्यवसाय करू शकता. त्यातील सहा व्यवसाय संध्या मी ह्या लेखात नमूद केल्या आहेत. पुढील काही लेखांमध्ये आणखीन व्यवसायांबद्दल आपण बोलू. फक्त एक गोष्ट महत्वाची ज्याची तुम्हाला प्रचंड गरज लागेल ती म्हणजे "सातत्य".                  ...

व्यवसाय अयशस्वी होण्याची 6 कारणे व त्यावरील उपाय

Image
            तुम्ही व्यावसायिक असाल किंवा होऊ इच्छित असाल तर तुम्हाला वाटते का कि तुम्ही व्यवसाय करताना कमीत कमी चुका करून जास्तीत जास्त यश मिळवावे? नक्कीच व्यवसाय करताना आपल्या कडून चुका होणारच , खरेतर जर तुम्ही चुकत नसाल म्हणजे तुम्ही नवीन काही करत नाही आहात असा त्याचा अर्थ होतो.  बरेच लोक मला काहीतरी समजले म्हणून व्यवसाय सुरु करतात आणि नंतर शिकणे सोडून देतात.  व्यवसाय म्हणजे एक कला आणि विज्ञान आहे. जर तुम्ही ह्या विज्ञानाचे काही नियम पाळलेत तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आपल्याला अश्या  ५ टक्के यशस्वी व्यवसायिकांमध्ये येऊन जगामध्ये आमूलाग्र बदल घडवायचे असतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.                       मी अजय दरेकर तुमचा युवा व्यवसाय मार्गदर्शक, Versatile Educaare System आणि Versatile Youth Business Forum चा एक संस्थापक. गेले १७ वर्ष मी हजारो तरुणांना व्यवसाय आणि स्किल मार्गदर्शन करीत आहे. येत्या ३ वर्षात १०० नवीन तरुण व्यवसायिक घडवण्यासाठी कार्यतत्पर आहे. तुम्हाला...

तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या

Image
                                 मित्रांनो तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय का?  तुम्हाला तुमच्या व्यवसायाची धमाकेदार सुरुवात करून तो पुढच्या १०० वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त चालावा असे वाटेत का? मग त्या आधी पुढील गोष्टी वाचा -                 मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की १०० पैकी ५० व्यवसाय ज्या वर्षी सुरु होतात त्याच वर्षी बंद पडतात, आणि त्यातलेच ७० व्यवसाय पुढच्या १० वर्षात बंद होतात. शिवाय Institute for Business Value and Oxford Economics नुसार ९०% भारतीय स्टार्ट अप्स पहिल्या ५ वर्षात बंद होतात.           ह्याची बरीच कारणे असली तरी ग्राहकाच्या गरजेनुसार Innovative  प्रॉडक्ट किंवा सर्विसेस तयार करण्याची असमर्थता हे सर्वात मोठे कारण आहे. दुसरे कारण आहे आपले तरुण long Term व्यावसायिक प्लांनिंग करत नाहीत. या व अश्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून जाणून घ्या तरुणांनानी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ...

"तरुणांनो" हे "५ मुलभूत तरी अतिप्रभावी" गुण तुमच्या व्यावसायिकतेचा पाया उत्कृष्ट करतील

Image
            "मित्रांनो तुम्हाला खात्री आहे का, की शाळा आणि College मध्ये तुम्ही जे शिक्षण घेतलेत किंवा घेत आहात फक्त त्याच्याच जोरावर तुम्ही उत्कृष्ट व्यावसायिक होऊ शकता?" नक्कीच नाही,           उलट भारतीय शिक्षण व्यवस्था इंग्रजांनी कारकून निर्माण करण्यासाठी तयार केली आणि आपण गेली ७० वर्ष त्याचेच अनुकरण करतोय हे आता सिद्ध झाले आहे. बघा ना अगदी २४-२५ वय होईपर्यंत आपल्याला पैश्याचे व्यवहार करायला भीती वाटते, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे कठीण जाते, आपल्यातली Creativity हळूहळू कमी होत जाते, आपण इन्व्हेंशन करायला पुढाकार घेत नाही इत्यादी ... म्हणून काळाची गरज आहे कि आपण तरुणांनी ह्या चौकटीबाहेर पडून स्वतःच पुढाकार घेऊन काही महत्वाचे गुण आत्मसात करायला हवेत. तुम्ही चांगली पुस्तके व माणसे वाचली पाहिजेत अनुभवली पाहिजेत, मला माझ्या आयुष्यात ह्याचा खूपच फायदा झाला.  मी माझ्या ब्लॉग च्या माध्यमातून व YouTube व्हिडिओच्या माध्यमातून असे काही गुण तुमच्यापर्यंत पोहचवत आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या, आणि आजच्या युगात यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी...

"५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात"

Image
  तुम्हाला माहित आहे का? संशोधनाने हे सिद्ध झालय की तरुण मुले जास्त चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतात. भारतात ६०% तरुण हे शिक्षण घेऊनही अनएम्प्लॉएबल आहेत.  तसेच ह्यातील कितीतरी तरुण चुकीच्या मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न करतात तर कितीतरी काही करायला नाही म्हणून डिप्रेशन मध्ये जातात. ह्याची बरीच कारणे असली तरी कालबाह्य शिक्षणव्यवस्था हे मूळ कारण आहे, शिवाय आपण तरुणांना व्यवसायासाठी उद्दयुक्त करत नाही. व्यवसाय हे असे माध्यम आहे जे तरुणांना स्वतंत्र विचार करायला तर शिकवतेच आणि पैश्यांचे , वेळेचे , निर्णयाचे स्वातंत्र देते. म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसायाकडे वळणे हे त्यांच्यासाठी आणि आपल्या देशासाठी खूप उपयोगी ठरेल. मग आज जाणून घेऊया ५ जबरदस्त गुण जे तरुणांमध्ये उपजतच असतात ज्याला चालना दिली तर वरील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात. आणि तुम्ही तरुण असाल किंवा तरुणांचे पालक असाल हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा तुम्हाला कृती करण्यासारख्या आणि तरुणांना प्रोत्साहनासाठी बऱ्याच गोष्टी इथे मिळतील. मी अजय दरेकर गेल्या १७ वर्षात अशा हजारो तरुणांना भेटलो आहे. “Versatile Educaare System” अंतर...