व्यवसाय अयशस्वी होण्याची 6 कारणे व त्यावरील उपाय
तुम्ही व्यावसायिक असाल किंवा होऊ इच्छित असाल तर तुम्हाला वाटते का कि तुम्ही व्यवसाय करताना कमीत कमी चुका करून जास्तीत जास्त यश मिळवावे? नक्कीच व्यवसाय करताना आपल्या कडून चुका होणारच , खरेतर जर तुम्ही चुकत नसाल म्हणजे तुम्ही नवीन काही करत नाही आहात असा त्याचा अर्थ होतो. बरेच लोक मला काहीतरी समजले म्हणून व्यवसाय सुरु करतात आणि नंतर शिकणे सोडून देतात. व्यवसाय म्हणजे एक कला आणि विज्ञान आहे. जर तुम्ही ह्या विज्ञानाचे काही नियम पाळलेत तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आपल्याला अश्या ५ टक्के यशस्वी व्यवसायिकांमध्ये येऊन जगामध्ये आमूलाग्र बदल घडवायचे असतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. मी अजय दरेकर तुमचा युवा व्यवसाय मार्गदर्शक, Versatile Educaare System आणि Versatile Youth Business Forum चा एक संस्थापक. गेले १७ वर्ष मी हजारो तरुणांना व्यवसाय आणि स्किल मार्गदर्शन करीत आहे. येत्या ३ वर्षात १०० नवीन तरुण व्यवसायिक घडवण्यासाठी कार्यतत्पर आहे. तुम्हाला...