व्यवसाय अयशस्वी होण्याची 6 कारणे व त्यावरील उपाय


           तुम्ही व्यावसायिक असाल किंवा होऊ इच्छित असाल तर तुम्हाला वाटते का कि तुम्ही व्यवसाय करताना कमीत कमी चुका करून जास्तीत जास्त यश मिळवावे?

नक्कीच व्यवसाय करताना आपल्या कडून चुका होणारच , खरेतर जर तुम्ही चुकत नसाल म्हणजे तुम्ही नवीन काही करत नाही आहात असा त्याचा अर्थ होतो. 

बरेच लोक मला काहीतरी समजले म्हणून व्यवसाय सुरु करतात आणि नंतर शिकणे सोडून देतात.  व्यवसाय म्हणजे एक कला आणि विज्ञान आहे. जर तुम्ही ह्या विज्ञानाचे काही नियम पाळलेत तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आपल्याला अश्या  ५ टक्के यशस्वी व्यवसायिकांमध्ये येऊन जगामध्ये आमूलाग्र बदल घडवायचे असतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. 

                     मी अजय दरेकर तुमचा युवा व्यवसाय मार्गदर्शक, Versatile Educaare System आणि Versatile Youth Business Forum चा एक संस्थापक. गेले १७ वर्ष मी हजारो तरुणांना व्यवसाय आणि स्किल मार्गदर्शन करीत आहे. येत्या ३ वर्षात १०० नवीन तरुण व्यवसायिक घडवण्यासाठी कार्यतत्पर आहे. तुम्हाला ह्या Mission मध्ये सहभागी व्हायचे असेल तर ब्लॉग च्या खाली Facebook आणि Whats app ग्रुप ची लिंक दिली आहे. चला मग पाहूया ६ कारणे ज्यामुळे व्यवसायिक अयशस्वी होतात

1. अयशस्वी नेतृत्व


       कोणत्याही Organisation च्या यशामध्ये आणि अपयशामध्ये नेतृत्वाचा खूप मोठा वाटा असतो. भावनिक निर्णय घेणे, चुकीच्या संस्कृतीची निर्मिती करणे, अयोग्य निर्णय घेणे, तसेच आपल्या सहकाऱ्यांना त्यांची मते मांडू न देणे किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे अश्या गोष्टींमुळे एक चुकीचे नेतृत्व स्वतःच्या कंपनीला बुडवू शकते. बऱ्याच वेळेला व्यावसायिकाचा Ego हा सुद्धा त्याच्या कंपनी च्या प्रगतीच्या मध्ये येतो. 

 

काय करावे?

             कंपनी लहान असो अथवा मोठी लीडर ची भूमिका अतिशय महत्वाची असते. लीडरकडे दोन महत्वाच्या गोष्टी असणे गरजेचे आहे १. Professional विल २. Humility.  एक उत्तम नेता नेहमी आपल्या Organisation साठी योग्य निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करतो. असे निर्णय घेताना तो भावनिक होत नाही. त्याचवेळी तो आपल्या टीम ला व त्यांच्या Development ला Priority देतो. तो आपल्या कंपनी च्या Vison ला स्वतःच्या आणि टीम च्या नेहमी समोर ठेवतो. त्याच्याकडे स्वयं शिस्त असणे अतिशय महत्वाचे असते.  

 २. वेगळेपण आणि मूल्यांची कमतरता -

             सध्याचे युग हे Copycat चे आहे. म्हणजे जो तो एकमेकांची नक्कल करतोय. काही अंशी हे गरजेचे आणि उपयोगी देखील आहे. तरी Competition च्या जगात तुमचा ग्राहक तुमच्या वेगळेपणावर लक्ष केंद्रित करून असतो. बरेच व्यवसाय आपले वेगळेपण टिकवून ठेवण्यात अपयशी होतात. शिवाय कंपनी च्या Vision सोबत तिच्या Values अबाधित ठेवायला बऱ्याच कंपन्या Fail होतात. कितीतरी कंपन्यांमध्ये त्यांच्या शेवटच्या कर्मचार्यांपर्यंत Values पोहोचलेल्या नसतात आणि हे एक मोठे कारण ठरते एखादा व्यवसाय अयशस्वी होण्याचे. 

 

काय करावे?

          प्रत्येक व्यवसायिकाने व्यवसाय सुरु करतानाच आपल्या कंपनीचे आणि Product चे वेगळेपण काय असेल ते ठरवायला हवे. अगदी Mobiles  आणि Laptop  च्या कंपन्यांचे उदाहरण घेतलेत तरी प्रत्येकाची स्वतःची ओळख त्यांच्या Features, सर्विस, Designing , किंमत ह्यानुसार ठरलेली आहे. उदा. डॉमिनोस जरी पिझ्झा विकत असला तरी त्याचे वेगळेपण ३० मिनिट्स मध्ये पिझ्झा हे आहे. त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या कंपनीच्या मूल्यांची माहिती व्यावसायिकाने जातीने करून द्यायला हवी आणि ती मूल्ये जगायला शिकवली पाहिजेत. 

 3. ग्राहक  व त्यांच्या गरजांच्या  संपर्कात नसणे - 

 


               Kodak नावाची एक कंपनी काही वर्षांपूर्वी अस्तित्वात होती आणि खूप छान व्यवसाय करत होती. त्यांचा व्यवसाय होता Camera आणि कॅमेराचे रोल बनवण्याचा. नोकिया ह्या मोबाइल कंपनी ने कॅमेरा मोबाइल बाजारात आणला आणि त्यानंतर प्रत्येक मोबाइल मध्ये कॅमेरा येऊ लागला.  अगदी दोन वर्षात Kodak कंपनी दिवाळखोर होऊन बंद पडली. ह्याचे एक कारण ग्राहकाच्या गरजेकडे दुर्लक्ष. आपल्या व्यवसायाचा आधारस्तंभ आपला ग्राहक आहे जर तुम्ही त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष केलेत किंवा त्याच्या संपर्कात नाही राहिलात तर तो तुम्हाला विसरतो आणि तुमचा व्यवसाय ठप्प होतो. 

 काय करावे?

         ह्यासाठी एक जबरदस्त नियम जो तुम्ही पाळला पाहिजे तो म्हणजे " वर्षातून कमीत कमी ६ वेळा तुम्ही तुमच्या ग्राहकापर्यंत किंवा संभाव्य ग्राहकापर्यंत पोहचले पाहिजे". Birthday, सण, ग्राहकांसाठी मार्गदर्शन सेमिनार्स, ऑफर्स, Survey  अश्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ह्याचा सर्वात मोठा फायदा हा होतो कि तुमच्या ग्राहकाची गरज आणि सध्याची मानसिकता तुमच्या लक्षात येते आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या Product आणि सर्विसेस मध्ये योग्य बदल करू शकता. ह्या नियमाचा आणखीन एक फायदा कि तुमच्या Company चा सेल्स वाढतो. 

 ४. Unprofitable Business Model - 

 


         बऱ्याच वेळेला व्यवसाय ज्या कल्पनेने सुरु केला जातो ती कल्पना उत्तमच असते फक्त त्याचा Business Plan जर चुकीचा असेल तर मग व्यवसाय अयशस्वी होतो. तुमचा Business Model चुकीचा असेल आणि तुम्ही त्यावर कितीही कष्ट केलेत तरीही तुमचा व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. माझ्या व्यावसायिक आयुष्याच्या सुरुवातीला अश्या अडचणी मी फार जवळून पहिल्या. प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्विसेस ला Sustainable Module मध्ये कसे रूपांतरित करायचे ह्यावर व्यवसायिक लक्ष देत नाहीत.    

 काय करावे?

             व्यवसाय सुरु करण्याआधी त्याचा Research करणे हि अतिशय महत्वाची पायरी आहे. आपले प्रतिस्पर्धी नक्की काय करतायत ते पहा. त्यांच्या प्रॉडक्ट्स चा अभ्यास हा तुमच्या Research चा भाग असला पाहिजे. तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस ची मार्केट मध्ये कुठे आणि किती गरज आहे ते शोधून त्याची किंमत ठरवली पाहिजे. त्यानुसार तुम्हाला मार्केटिंग प्लॅन तयार करायचा आहे. मित्रांनो ह्या साठी तुम्ही योग्य मार्गदर्शक निवडला पाहिजे जो तुमच्या व्यवसायाकडे वेगळ्या नजरेने पाहिल व भविष्यात येणाऱ्या अडचणी व संधींची माहिती तुम्हाला देईल. 

 

5. चुकीचे आर्थिक व्यवस्थापन -


                SmallBizTrends.com ह्या वेबसाइट ने एका Survey मध्ये सांगितले आहे कि ४० टक्के मध्यम स्वरूपाचे व्यवसाय प्रॉफिट कमावतात ३० टक्के Survive करतात आणि शेवटचे ३० टक्के Loss करतात. ह्याचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे चुकीचे आर्थिक व्यवस्थापन. फार कमी व्यावसायिक व्यवसायाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजन करतात किंवा शिकून घेतात. दुर्देवाने बऱ्याच व्यवसायिकांना आपल्या व्यवसायात येणाऱ्या आणि त्यातून बाहेर जाणाऱ्या पैश्याचे नियोजन करता येत नाही.  

 काय करावे?

               आर्थिक नियोजन हे एक शास्त्र आहे आणि प्रत्येक व्यवसायिकाने ते शिकलेच पाहिजे. तुम्ही आता व्यवसाय सुरु करताय मग अगदी सध्या अकाउंट बुक ने सुरु करू शकता. ह्या बुक मध्ये बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पैश्याचा हिशोब लिहा. आपण कोणत्या मार्केटिंग ऍक्टिव्हिटी वर किती खर्च करतोय आणि त्यातून आपण किती पैसे कमावतो याचे गणित तुम्ही प्रत्येक महिन्याला तपासले पाहिजे. तुमच्या व्यवसायाचा पैसा कुठे वाया जातोय ह्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रणाली तयार करा. 

 

6. अति वेगवान वाढ आणि विस्तार -

 


                सध्याच्या काळात बरेच व्यावसायिक वेगात विकास करण्याच्या मागे असतात. गेल्या १७ वर्षात मी असे बरेच उद्योग आणि उद्योजक पहिले ज्यांनी व्यवसायाचा विकास अति वेगात केला आणि तेवढ्याच वेगात तो बंद केला. हे गाडी चालवण्यासारखे आहे तुमची गाडी जास्त वेगात असली कि तिच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. तसेच बरेच व्यावसायिक अश्याच वेगात व्यवसायाचा विस्तार करतात . मग त्या विस्ताराचा खर्च किंवा त्या वेगात आलेले कर्मचारी असलेल्या व्यवसायाला पण धोका निर्माण करतात. 

 काय करावे?

               लक्षात ठेवा वेग नाही स्थिरता महत्वाची. कोणासोबतही स्पर्धा करू नका. आपल्या व्यवसायाचे ३, ५, आणि १० वर्षाचे ध्येय आणि Planning तयार करा. कितीही अडचणी आल्या तरी तुमचा व्यवसाय सावरेल असे नियोजन करा. आलेला पैसा गुंतवा, वाचवा आणि मग व्यवसाय वाढवा. नवीन Products आणि Services साठी पैश्याची तरतूद करून ठेवा. एक जबरदस्त विश्वासू Team तयार करण्याचे ध्येय ठेवा.  आणि स्वतःच्या व व्यवसायाच्या Development साठी एक उत्कृष्ट मार्गदर्शक निवडा.

              तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास कंमेंट करा आणि माझ्या व्यवसायिक घडवण्याच्या मोहिमेत शामिल व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लिक नक्की करा 

Facebook - https://www.facebook.com/groups/4572379476137547/?ref=share (ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी हा ग्रुप जॉईन करा )

Whats App - https://chat.whatsapp.com/CmYJWW1B2yAHM4kfQkUpN7

Youtube- https://www.youtube.com/results?search_query=versatile+educare+system

इतर ब्लॉग 

"५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात"

"तरुणांनो" हे "५ मुलभूत तरी अतिप्रभावी" गुण तुमच्या व्यावसायिकतेचा पाया उत्कृष्ट करतील

"तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या"


Comments

Popular posts from this blog

तरुण उद्योजकांसाठी 6 सर्वोत्कृष्ट व्यवसाय

"तरुणांनो" हे "५ मुलभूत तरी अतिप्रभावी" गुण तुमच्या व्यावसायिकतेचा पाया उत्कृष्ट करतील