तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या
मित्रांनो तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय का?
तुम्हाला तुमच्या व्यवसायाची धमाकेदार सुरुवात करून तो पुढच्या १०० वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त चालावा असे वाटेत का?
मग त्या आधी पुढील गोष्टी वाचा -
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की १०० पैकी ५० व्यवसाय ज्या वर्षी सुरु होतात त्याच वर्षी बंद पडतात, आणि त्यातलेच ७० व्यवसाय पुढच्या १० वर्षात बंद होतात. शिवाय Institute for Business Value and Oxford Economics नुसार ९०% भारतीय स्टार्ट अप्स पहिल्या ५ वर्षात बंद होतात.
ह्याची बरीच कारणे असली तरी ग्राहकाच्या गरजेनुसार Innovative प्रॉडक्ट किंवा सर्विसेस तयार करण्याची असमर्थता हे सर्वात मोठे कारण आहे. दुसरे कारण आहे आपले तरुण long Term व्यावसायिक प्लांनिंग करत नाहीत. या व अश्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून जाणून घ्या तरुणांनानी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या.
मी अजय दरेकर गेल्या १७ वर्षात हजारो तरुणांना भेटलो आहे. Versatile Educaare System अंतर्गत Youth Business Hub मध्ये आम्ही तरुणांना त्यांच्या उपजत गुणांसाठी प्लॅटफॉर्म व ट्रेनिंग देत आहोत. तसेच तुमच्या सुप्त गुणांना शोधून त्यानुसार यशस्वी व्यवसाय उभा करण्यास वेगवेगळ्या प्रोग्रॅम च्या माध्यमातूम मार्गदर्शन करतो.
१. तुमची “Passion” शोधा
तुमचा व्यवसाय म्हणजे तुमच्या स्वप्नांपर्यंत तुम्हाला पोहचवणारे सर्वात मोठे आणि कदाचित एकमेव माध्यम. आणि तरी तुम्हाला आवडेल का की स्वप्नांचा आणि यशाचा हा प्रवास कंटाळवाणा व्हावा किंवा तुम्ही तो इच्छा नसताना करताय? नक्कीच नाही. म्हणून आपण आपला व्यवसाय हा आपल्या आवडीच्या क्षेत्रात करायला हवा. व्यवसाय क्षेत्र निवडताना काळजी घ्या कि त्या क्षेत्रात तुम्हाला प्रचंड आवड असेल. त्यासाठी तुम्ही स्वतःचा अभ्यास करायला हवा. स्वतःमधील Skills, Habits लिहून काढा. कोणत्या क्षेत्रातले वाचन करायला तुम्हाला आवडते?, कोणत्या क्षेत्राविषयी तुम्हाला उत्सुकता आहे? असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजेत. Versatile Youth Business Forum मध्ये आम्ही ह्यासाठी विशेष मार्गदर्शन करतो कारण हाच तुमच्या यशस्वी व्यवसायाचा पाया आहे. म्हणून मित्रांनो थोडा वेळ लागला तरी चालेल पण तुमची Passion शोधा.
२. तुमच्या व्यवसाय क्षेत्राचा अभ्यास करा (Know Your Market)
तुम्ही जे क्षेत्र निवडले आहे किंवा जे प्रॉडक्ट/सर्विस ठरवले आहे त्याचा खोलवर अभ्यास कराच. मार्केट मध्ये असे प्रॉडक्ट्स/ सर्व्हिसेस आहेत का? त्यांच्या किमती किती आहेत? ते व्यावसायिक कशापद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहचतात? तुमच्या संभाव्य ग्राहकाच्या कोणत्या गरजा आहेत? तुमच्या संभाव्य ग्राहकाच्या सर्वात मोठ्या अडचणी ज्या त्याला जाणवत आहेत किंवा जाणवत नाहीत त्या काय आहेत? तुमचे प्रतिस्पर्धी कोण होऊ शकतील? जेवढा जास्त तुम्ही तुमच्या व्यवसाय क्षेत्राचा आणि संभाव्य ग्राहकाचा अभ्यास कराल तेवढ्या तुमच्याकडून चुकांचे प्रमाण कमी होईल व तुम्ही कमी वेळात ग्राहकाच्या मनात घर कराल.
३. आर्थिक नियोजन (Business Finance)
तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी पैसे कसे उभारणार आहात ? तुमच्या व्यवसायासाठी कुटुंबाकडून पैसे घेणार, मित्रांकडून घेणार, Partnership करणार. की तुम्ही पतपेढी, बँक किंवा कोणत्याही योजनेमधून पैसे उभे करणार आहात. मार्केट मध्ये असे बरेच मोठे व्यवसायिक असतात ज्यांना जर तुमची कल्पना आणि Business प्लॅन आवडला तर ते तुम्हाला व्यवसायासाठी सुरुवातीचा फंड देतात. ज्यासाठी वेगवेगळ्या अटी असतात. तुम्ही अश्या लोकांना आपली कल्पना प्रेसेंन्ट करू शकता. फक्त एक काळजी घ्या कि व्यवसायासाठी आर्थिक नियोजन करताना ते अश्या मार्गांनी करू नका कि तुमचे सर्व लक्ष त्या एकाच गोष्टीकडे लागेल व मूळ व्यसायकडे तुम्ही दुर्लक्ष कराल. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
४. Sacrifices ( त्याग करण्याची मानसिकता बनवा)
मित्रांनो मी वयाच्या १७ व्या वर्षी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली. आणि पुढील १२ ते १५ वर्ष मी बऱ्याच अश्या गोष्टींचा स्वखुशीने त्याग केला जे तरुण वयात सहसा आपल्याला सोडवत नाहीत. पार्ट्या करणे, movies जाणे, प्लॅन न करता फिरायला जाणे, विनाकारण शॉपिंग करणे अशी भली मोठी यादी तयार होईल. आनंदाची गोष्ट हि होती कि ह्या सर्व गोष्टींचा त्याग (sacrifice) करत असताना मला तिळमात्रही खंत वाटली नाही आणि याचे कारण आहे ह्या लेखातला पहिला पॉईंट तो म्हणजे Passion . मी माझ्या करिअर च्या पहिल्या दिवशी जेवढा ह्या क्षेत्राबद्दल उत्साही होतो तेवढाच उलट त्यापेक्षा जास्त आज आहे. म्हणून मित्रांनो Sacrifices (त्याग) तुम्हाला जबरदस्त ताकद देते हे नेहमी लक्षात ठेवा. आणि स्वतःचा फोकस दुप्पट करा.
५. योग्य "Mentor" मार्गदर्शक आत्ताच निवडा
मी आवर्जून सांगेन कि मी जे काही यश मिळवले आहे त्यात सर्वात मोठा वाटा हा माझ्या Mentors चा आहे कारण योग्य वेळी त्यांनी मला योग्य सल्ले दिले. मला बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केले आणि केतन गावंड सरांनी मला सर्वात जास्त शिकवले. Mentor निवडताना त्याचे दूरगामी धेय्य जाणून घ्या, त्यांची मूल्ये जाणून घ्या, त्याचे Wisdom जाणून घ्या, आणि एकदा का तुम्हाला योग्य Mentor मिळाला कि त्याला Surrender व्हा आणि सतत त्याच्या संपर्कात राहा. विशेषकरून महत्वाचे निर्णय घेताना त्यांचा सल्ला घ्या. Mentor तुमच्याच क्षेत्रातला असला पाहिजे असे काही नाही फक्त त्याच्याकडे वरील गुण असूदेत. माणसांसोबतचाच काही पुस्तकं देखील तुम्ही जोपासली पाहिजेत जी तुम्हाला मार्गदर्शन करतील. आज मार्केट मध्ये व्यवसाय मार्गदर्शनावर मोठं मोठ्या व्यावसायिकांची बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.
६. व्यवसायाच्या सर्व घटकांचा अभ्यास करा
तुमच्याकडे एखादी कल्पना येणे हे व्यवसाय करण्याचे मूळ कारण असते. तरी व्यवसायामध्ये Finance, Operation, सेल्स, मार्केटिंग, Advertising, Recruiting, ब्रॅण्डिंग, Systemisation सारखे विषय देखील असतात फक्त जोश आहे म्हणून लगेच सुरुवात न करता तुमच्या व्यवसायाचा वरील सर्व बाजूने नीट विचार करून ते कागदावर उतरवा. ह्यासाठी थोडा वेळ गेला तरी चालेल. योग्य माणसांसोबत ह्यावर चर्चा करा आणि जमल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बरेच व्यवसाय ही तयारी न करता मार्केट मध्ये येतात व मग आदळतात. तुम्ही ही चूक करू नका.
७. प्लँनर बणा
"If you fail to plan it means you are planning to fail" म्हणजे जर तुम्ही प्लॅन करण्यात अपयशी ठरला तर कदाचित तुम्ही अपयशी होण्याचे प्लॅन केले आहे. प्रत्येक यशस्वी व्यवसायिकाला माहित असते कि पुढच्या एक, तीन आणि पाच वर्षात तो कोणती धेय्य साध्य करणार आहे आणि हेच त्यांच्या सातत्य पूर्ण यशाचे कारण असते. तुम्हाला माहित असले पाहिजे तुम्ही केव्हा कुठे आणि कसे पोचणार आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणाची आणि कसली मदत लागणार आहे आणि तुम्हाला कोणत्या अडचणींवर मात करण्यासाठी काय तयारी करावी लागेल, काय शिकावे लागेल. ह्याचाच अर्थ तुम्हाला दूरदृष्टी (anticipation) ची कला अवगत करावी लागेल. एका लेखात मी नक्की दूरदृष्टी (anticipation) वर लिहेन कारण हा व्यवसायिकेतचा जबरदस्त गुण मी बऱ्याच यशस्वी व्यावसायिकांमध्ये पहिला आहे.
तर मित्रांनो ह्या पायऱ्या follow करा आणि धमाकेदार सुरुवात करा तुमच्या नवीन व्यवसायाची, तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही पायरीबाबत जास्त माहिती किंवा शंका असतील तर नक्की संपर्क करा. अश्या जबरदस्त गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा असेल तर आमचा Versatile Youth Business Hub हा फेसबुक ग्रुप जॉईन करा, आमच्या संपर्कात राहण्यासाठी पुढील Whats App ग्रुप जॉईन करा . तसेच विविध Skills शिकण्यासाठी आपल्या YouTube Channel ला Subscribe करा. Blog शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद.
व्यवसाय अयशस्वी होण्याची 6 कारणे व त्यावरील उपाय
"५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात"
“व्यवसाय अयशस्वी होण्याची 6 कारणे व त्यावरील उपाय”








Too good
ReplyDeleteखुपच छान
ReplyDelete