"तरुणांनो" हे "५ मुलभूत तरी अतिप्रभावी" गुण तुमच्या व्यावसायिकतेचा पाया उत्कृष्ट करतील
उलट भारतीय शिक्षण व्यवस्था इंग्रजांनी कारकून निर्माण करण्यासाठी तयार केली आणि आपण गेली ७० वर्ष त्याचेच अनुकरण करतोय हे आता सिद्ध झाले आहे. बघा ना अगदी २४-२५ वय होईपर्यंत आपल्याला पैश्याचे व्यवहार करायला भीती वाटते, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे कठीण जाते, आपल्यातली Creativity हळूहळू कमी होत जाते, आपण इन्व्हेंशन करायला पुढाकार घेत नाही इत्यादी ... म्हणून काळाची गरज आहे कि आपण तरुणांनी ह्या चौकटीबाहेर पडून स्वतःच पुढाकार घेऊन काही महत्वाचे गुण आत्मसात करायला हवेत. तुम्ही चांगली पुस्तके व माणसे वाचली पाहिजेत अनुभवली पाहिजेत, मला माझ्या आयुष्यात ह्याचा खूपच फायदा झाला. मी माझ्या ब्लॉग च्या माध्यमातून व YouTube व्हिडिओच्या माध्यमातून असे काही गुण तुमच्यापर्यंत पोहचवत आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या, आणि आजच्या युगात यशस्वी व्यावसायिक होण्यासाठीचे मूलभूत आणि प्रभावी गुण समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा
नमस्कार मित्रांनो मी अजय दरेकर तुमचा "तरुण व्यावसायिक मार्गदर्शक" गेले १७ वर्ष विद्यार्थी विकास क्षेत्रात कार्यरत असून “Versatile Educaare System” आणि “Versatile Youth Business Forum” च्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय व व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन करत आहे.
चला मग जाणून घेऊया ५ मूलभूत तरी अतिप्रभावी गुण जे तुम्ही आत्मसात करायला हवे
१.आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग
- स्वतःला ओपन एंडेड प्रश्न विचारा , प्रॉब्लेम सोलविंग ऍबिलिटी वाढवा , तुमच्या कल्पना इतरांसोबत शेअर करा, एखाद्या घटनेकडे आणि त्याच्या सोलुशन कडे वेगळ्या Creative अँगल ने बघा , समाजातील अडचनींना तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवू शकता त्यावर विचार करा, समविचारी मित्रांसोबत व्यवसाय , कल्पना , ह्यांवर चर्चासत्र भरवा आणि त्यात सहभागी व्हा. स्टिव्ह जॉब्स , बिल गेट्स , रतन टाटा , फोर्ड, एलोन मास्क यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या इन्व्हेंशन चा अभ्यास करा. स्वतःच्या कल्पनेला कागदावर उतरवायला सुरुवात करा.
२.नेतृत्व गुण निर्माण करा –
मित्रांनो हा एक गुण तुम्हाला इतरांपासून वेगळे करतो, क्षेत्र कोणतेही असो नेतृत्व गुणाचे महत्व हे नेहमीच आभादित आहे. महात्मा गांधी , लोकमान्य टिळक ह्यांनी राजकीय/सामाजिक क्षेत्रात जे करून दाखवले तेच रतन टाटा, धीरूभाई अंबानी यांनी व्यवसाय क्षेत्रात केले आणि कपिल देव, महेंद्रसिंग धोनी यांनी क्रीडा क्षेत्रात केले ते फक्त नेतृत्व गुणांमुळेच. म्हणून मित्रांनो तुम्ही पुढाकार घ्या. स्वतःची संघटना तयार करणे ती वाढवणे आणि टिकवणे त्या संघटनेला योग्य मार्ग दाखवत राहणे हीच खऱ्या नेतृत्वाची कला आहे आणि त्याची सुरुवात जर तुम्ही आत्ताच केली तर खूप मोठे व्यवसाय विश्व तयार करू शकाल.
३.अनुभव घ्या –
मी माझ्या दहावीच्या परीक्षेनंतर हाऊस कीपिंग चे काम केले आणि त्यानंतर पुढील शिक्षण घेत असताना इन्शुअरन्स, बँकिंग, मार्केटिंग, कुरिअर, Manufacturing अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात पार्ट टाइम काम करून अनुभव घेतला. शिक्षण क्षेत्रात काहीतरी भव्य दिव्य करायचं हे स्वप्न बाळगत मी सतत काम करत राहिलो शिकत राहिलो पण वरील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवांमुळे मला एक वेगळा Wisdom मिळाला. हे सर्व सांगण्याचे कारण एव्हढेच कि तुम्ही ज्या क्षेत्रात करिअर करण्याचा, व्यवसाय करण्याचा विचार करताय त्या क्षेत्रात किंवा जिथे तुम्हाला selling , marketing शिकता येईल अश्या क्षेत्रात अनुभव घ्या. तुम्ही सर्व काही शाळा, कॉलेज मध्ये नाही शिकू शकत.
४.आर्थिक साक्षरता –
आपण सर्व Dhirubhai Ambani, Warren Buffett, Bill Gates, Robert Kiyosaki यांची नावे ऐकतो जगातील अतिश्रीमंत माणसांपैकी ही काही माणसे आहेत. तरी आपल्यापैकी फार कमीजण ह्यांनी श्रीमंत होण्यासाठी काय केले त्याचा अभ्यास करतो . अतिशय कमी वयापासून ह्या सर्व मंडळींनी फक्त पैश्याचे व्यवहार करायला सुरुवात केली एव्हढेच नाही तर पैसा आणि आर्थिक साक्षरता ह्याचा सतत अभ्यास करत राहिले. बचत , नियंत्रित खर्च, योग्य पद्धतीची गुंतवणूक आणि व्यवसाय यावर हे लोक वाचत राहिले ऐकत राहिले आणि त्या ज्ञानाचा उपयोग करत राहिले. तुम्ही सुद्धा यशस्वी व्यवसायिक होणार आहात म्हणून आर्थिक साक्षरतेला आजपासूनच सुरुवात करा. रॉबर्ट कियोसाकी यांचे "Rich Dad Poor Dad" हे पुस्तक वाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
५.सकारात्मक नातेसंबंध –
जगातला कोणताही यशस्वी व्यावसायिक तुम्हाला सांगेल कि उत्तुंग यश मिळवायला “माणसे जोडण्याची कला” किती महत्वाची आहे. म्हणूनच म्हटले जाते माणसे जोडा जग जिंका. हा असा गुण आहे जो आत्मसात करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील जसे कि Sympathy, Communication, बॉडी Language इत्यादी . . हा एक गुण तुम्हाला परिपूर्णतेकडे घेऊन जातो. तुमच्या शाळा आणि कॉलेज पेक्षा तुम्ही सकारात्मक माणसांकडून जास्त आणि Productive, Practical शिकता. "How to Win Friends and Influence People " हे पुस्तक तुम्हाला ह्यासाठी नक्की उपयोगी पडेल.
तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर वाचायला आवडेल ते Comment बॉक्स मध्ये लिहा, आणि तुमची व्यावसायिक होण्याची तीव्र इच्छा असेल तर पुढील Facebook Community ला जॉईन करा. धन्यवाद
https://www.facebook.com/groups/4572379476137547/?ref=share
https://www.youtube.com/channel/UCdgL8moO1zLc2XmVk64zepw
https://anchor.fm/ajay-khotu-darekar






Khup chan lekh ahe Dada...
ReplyDeleteKhup chan lekh ahe Dada...
ReplyDeletethank you dear
Delete