"५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात"
तुम्हाला माहित आहे का?
संशोधनाने हे सिद्ध झालय की तरुण मुले जास्त चांगल्या पद्धतीने
व्यवसाय करू शकतात.
भारतात ६०% तरुण हे शिक्षण घेऊनही अनएम्प्लॉएबल आहेत. तसेच ह्यातील कितीतरी तरुण चुकीच्या
मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न करतात तर कितीतरी काही करायला नाही म्हणून डिप्रेशन मध्ये जातात.
ह्याची बरीच कारणे असली तरी कालबाह्य शिक्षणव्यवस्था हे मूळ कारण आहे, शिवाय आपण तरुणांना
व्यवसायासाठी उद्दयुक्त करत नाही. व्यवसाय हे असे माध्यम आहे जे तरुणांना स्वतंत्र विचार करायला
तर शिकवतेच आणि पैश्यांचे , वेळेचे , निर्णयाचे स्वातंत्र देते. म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी
व्यवसायाकडे वळणे हे त्यांच्यासाठी आणि आपल्या देशासाठी खूप उपयोगी ठरेल. मग आज जाणून
घेऊया ५ जबरदस्त गुण जे तरुणांमध्ये उपजतच असतात ज्याला चालना दिली तर वरील बऱ्याच अडचणी दूर
होऊ शकतात. आणि तुम्ही तरुण असाल किंवा तरुणांचे पालक असाल हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा तुम्हाला कृती
करण्यासारख्या आणि तरुणांना प्रोत्साहनासाठी बऱ्याच गोष्टी इथे मिळतील.
मी अजय दरेकर गेल्या १७ वर्षात अशा हजारो तरुणांना भेटलो आहे. “Versatile Educaare
System” अंतर्गत “Versatile Youth Business Forum” मध्ये आम्ही तरुणांना त्यांच्या उपजत गुणांसाठी
प्लॅटफॉर्म व ट्रेनिंग देत आहोत.
चला मग जाणून घेऊया ......
१. “No Fear of Loosing” (अपयशाची भीती नसते) -
जगभरातील यशस्वी व्यावसायिकांचा अभ्यास केल्यावर हे लक्षात आले आहे कि त्यांपैकी
जवळजवळ प्रत्येकालाच बऱ्याच वेळेला अपयशाला सामोरे जावे लागले आहे , तरी सुद्धा ह्या
व्यावसायिकांमध्ये अपयशाची भीती नव्हती.
विशेष म्हणजे बालकावस्था व तारुण्यावस्थेमध्ये अपयशाची भीती नसल्याकारणाने मुले व तरुण
वेगवेगळे प्रयोग करण्यास नेहमी तत्पर असतात आणि म्हणून त्यांचा हा गुण व्यवसायासाठी अतिउत्तम ठरतो.
उदा. मार्क झुकेरबर्ग - फेसबुक
२. टेकनॉलॉजिमध्ये एक्स्पर्ट -
आजच्या काळात पालकांना , शिक्षकांना मुलांकडून टेकनॉलॉजि शिकावी लागत आहे . तो काळ दूर
नाही जेव्हा ३ ते ४ वर्षाचे मुलं प्रोग्रामिंग करून रोबोट बनवून घरी त्यांच्यासोबत खेळतील किंवा कामे करून
घेतील. त्यामुळे आजच्या काळात यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी लागणारे सर्वात मोठे शास्त्र “टेकनॉलॉजि” हे
तरुणांकडे उपजतच आहे.
३. जिज्ञासू वृत्ती –
मी हे केले तर काय होईल? ही गोष्ट अशीच का बनवली जाते? असे प्रश्न बालवयात व
तरुणपणातच मुलांना नैसर्गिक रित्या पडतात. जगातले सर्वच यशस्वी व्यवसाय हे कोणतीतरी अडचण
सोडवण्यासाठी किंवा कठीण गोष्ट सोपी करण्यासाठी अस्तित्वात आले. आणि तरुणांची जिज्ञासू वृत्ती ह्यासाठी
सर्वात पोषक आहे.
उदा. Google , Uber
४. Creativity -
गेल्या १७ वर्षात मी हजारो तरुणांना बघितलंय ज्यांनी “क्रीटीव्हिटी व टेकनॉलॉजि” च्या जोरावर
स्वतःचे अस्तित्व उभे केले आहे . आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या क्रीटीव्हिटीमुळे
व्यावसायिक जगतात अनेक विक्रम करू शकतील.
अगदी फोटोग्राफी, कूकिंग, फॅशन designing ह्या क्षेत्रात तरुण आज उत्तुंग कामगिरी करत
आहेत त्यामुळे तरुणांनी आपल्या कल्पकतेला वाव दिला पाहिजे व शिक्षक - पालकांनी त्यांना
प्रोत्साहन देऊन त्यांना व्यावसायिक होण्यास प्रवृत्त करायला हवे.
५. नवीन ज्ञान आत्मसात करण्याची ताकद –
आपल्या बालपणी आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक, शिक्षक व बाबा हेच
माध्यम होते . आजच्या तरुणांकडे चौथी गोष्ट आहे ती म्हणजे गूगल बाबा. टेकनॉलॉजि चा उपयोग करून
आजचा तरुण कोणत्याही क्षेत्रातले ज्ञान मिळवतोय व आत्मसात करून त्यावर कृती करतोय हीच त्याची खरी
ताकद आहे.
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की Comment करा. आणि तरुण व्यावसायिक
घडवण्याच्या माझ्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील link वर क्लिक करून माझ्या फेसबुक ग्रुप ला
जॉईन व्हा
https://youtu.be/uGzqDxySJhg
https://anchor.fm/ajay-khotu-darekar
धन्यवाद
श्री. अजय दरेकर






Very good thoughts
ReplyDeleteGreat sir..
ReplyDelete